facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / सेतू सुविधा केंद्रात १५ स्वाइप मशीन

सेतू सुविधा केंद्रात १५ स्वाइप मशीन

जिल्हा प्रशासनातर्फे नोटाबंदी झाल्यानंतर नागरिकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सेतू सुविधा केंद्रातही १५ स्वाइप मशीन उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सेतूमध्ये रहिवासी, उत्पन्न, वय-अधिवास-राष्ट्रीयत्व, नॉन क्रिमिलेअर, जात प्रमाणपत्र, रेशनकार्डसाठी अर्ज आदी विविध प्रमाणपत्रे काढण्यासाठी मोठी गर्दी होते. अनेकदा सुट्या पैशांवरून काउंटरवरील कर्मचाऱ्यांसोबत वाद होतात. आता कॅशलेस उपक्रमाअंतर्गत स्वाइप मशीन उपलब्ध करून देण्यात आल्याने ही अडचण दूर होणार आहे, मात्र नागरिकांमध्ये अजूनही रोखीने व्यवहार करण्याची सवय असल्याने; तसेच प्रमाणपत्रासाठीचे शुल्क हे शंभर रुपयांपेक्षा कमी असल्याने नागरिकांकडून रोखीनेच व्यवहाराला पसंती दिली जात आहे. सेतू सुविधा केंद्रात २५ काउंटर असून, यापैकी १५ काउंटरवर रोखीने व्यवहार होतात. या सर्व १५ काउंटरवर प्रत्येकी एक स्वाइप मशीन देण्यात आले आहेत.

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *