facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / पुणे / ‘कॅट’मध्ये राज्याची सरशी

‘कॅट’मध्ये राज्याची सरशी

व्यवस्थापन शाखेचे शिक्षण घेण्यासाठी नावाजलेल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’मध्ये (आयआयएम) प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (कॅट) निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत वीस जणांना १०० पर्सेंटाइल मिळाले असून, त्यामध्ये राज्यातून यश चौधरी आणि पॅट्रिक डिसुझा यांनी स्थान पटकाविले आहे. यश पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचा (सीओईपी) विद्यार्थी आहे.
कॅट परीक्षेत उत्तम गुण मिळवणाऱ्यांमध्ये यंदा मुलांचे प्रमाण अधिक असून, बहुसंख्य जण इंजिनीअर आहेत. यशने टाइम संस्थेतून प्रशिक्षण घेतले आहे, तर पॅट्रिकने कोचिंग अॅकॅडमीतून प्रशिक्षण घेतले आहे. यश विमान नगर परिसरात राहत असून, सीओईपीमध्ये इलेक्ट्रिकल शाखेत अंतिम वर्षात शिकत आहे. गणिताची आवड असल्यानेच पदव्यत्तुर शिक्षण व्यवस्थापनात शाखेत फायनान्समध्ये घेण्याचे त्याने ठरवले. देशातील टॉपच्या म्हणजचे ‘आयआयएम’मधून एमबीएचे शिक्षण घेण्याची त्याची इच्छा होती. त्यानुसार जूनपासून कॅट परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली. अभ्यासाबरोबरच ऑनलाइन ‘मॉक’ परीक्षा देण्यावर त्याने भर दिला. ठरावीक कालावधीत अभ्यास झाला की मॉक परीक्षा देत होतो. या परीक्षेचा अधिक फायदा झाला, असे यशने सांगितले.
आयआयएम बेंगळुरूने चार डिसेंबरला देशभरातील १३८ परीक्षा केद्रांवर कॅट परीक्षा घेतली. सुमारे १ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. पुण्यातून १० ते १५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सोमवारी सकाळी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मोबाइलवर मेसेज पाठविण्यात आले. विद्यार्थ्यांना www.iimcat.ac.in या संकेतस्थळावर ‘लॉग इन आयडी’ आणि ‘पासवर्ड’ टाकून निकाल पाहता येणार आहेत. परीक्षा कठीण असून देखील चांगला निकाल लागल्याने विद्यार्थ्यांना अपेक्षित कॉलेजला प्रवेश मिळेल असे टाइम पुणे संस्थेचे संचालक टी. जी. परम यांनी सांगितले. दरम्यान, आयआयटी चेन्नईतून केमिकल इंजिनीअरिंगमध्ये अंतिम वर्षाला शिकणाऱ्या यश माहेश्वरीला ९९.९ पर्सेंटाइल मिळाले आहेत.

अभियांत्रिकीची आवड असल्याने या क्षेत्रात आलो. मात्र, आता अहमदाबादच्या प्रसिद्ध आयआयएममधून फायनान्समध्ये एमबीए करण्याची इच्छा आहे. कॅट परीक्षेत १०० पर्सेंटाइल मिळाले असल्याने तेथे प्रवेश मिळेल अशी आशा आहे.
– यश चौधरी

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *