facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / जळगाव / जीवन प्राधिकरणाची भूमिका संशयास्पद

जीवन प्राधिकरणाची भूमिका संशयास्पद

जळगाव महापालिकेला अमृत योजनेतून पाणीपुरवठा योजना मंजूर झालेली आहे. यासाठी केलेल्या निविदा प्रक्रियेत यातील एका एजन्सीने दुसऱ्या एजन्सीवर आक्षेप घेतल्याने प्रक्रिया खोळंबली आहे. तब्बल महिनाभरानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तिन्ही एजन्सींच्या निविदांच्या त्रुटी असल्याचे सांगत त्यांच्याकडून माहिती मागविण्याची सूचना केल्याने या प्रकरणातील प्राधिकरणाच्या भूमिकेबाबत संशय निर्माण झाला आहे.

महापालिकेचा अमृत योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्यातून पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाली आहे. यात जलवाहिन्यांची नवीन वितरण व्यवस्था करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यातील १९१ कोटी रुपयांच्या कामांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. यात तीन एजन्सींच्या निविदा प्राप्त झाल्या होत्या. यातील एका एजन्सीने दुसऱ्या एजन्सीवर आक्षेप घेतल्याने निविदा अद्याप उघडण्यात आलेल्या नाहीत.

प्रक्रिया रखडण्याची शक्यता

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी दिलेला अभिप्राय स्पष्ट नसल्याचे सांगत प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी जीवन प्राधिकरण विभागाला एका आठवड्यात स्पष्ट अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र पुन्हा जीवन प्राधिकरणाकडून महापालिकेला पत्र देऊन तिन्ही एजन्सींची माहिती मागविण्याच्या सूचना केल्या आहेत. एक महिन्यानंतर प्राधिकरणाने माहिती मागविल्याने ही प्रक्रिया पुन्हा रखडली जाण्याची शक्यता आहे.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *