facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / मुंबई / ओम पुरी मृत्यू: पाच जणांचे जबाब नोंदवले

ओम पुरी मृत्यू: पाच जणांचे जबाब नोंदवले

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत पुढे आले असले तरी पोलिस त्यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. या मृत्यूप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी पुरी यांच्या जवळच्या पाचजणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत.

ओम पुरी यांचा शवविच्छेदन अहवाल जे. जे. रुग्णालय आणि कलिना न्यायवैद्यक शाळेतून अद्याप आलेला नाही. त्यामुळे पुरी याचा मृत्यू घात आहे की, अपघात हे आत्ताच समजणे कठीण आहे, असे ओशिवरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष खानविलकर यांनी सांगितले.

पुरी यांच्या ड्रायव्हरने दिलेल्या माहितीनुसार त्यांचे मद्यपानाचे प्रमाण वाढले होते, तर नंदिता यांच्यापासून वेगळे होऊन पुरी यांना पुन्हा सीमा यांच्यासोबत संसार करायचा होता, असेही त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *