facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / जळगाव / एकच पर्व, बहुजन सर्व!

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी बुधवारी (दि. ११) दुपारी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मोर्चात सहभागी झालेल्या बांधवांकडून होणाऱ्या, ‘एकच साहेब, बाबासाहेब’ व ‘संविधानाची अंमलबजावणी करा, अॅट्रॉसिटी अॅक्ट कडक करा’ , ‘जय भीम’ अशा घोषणांनी अवघे जळगाव शहर दणाणले होते.

क्रांती मोर्चातर्फे बहुजन समाजातील उच्चशिक्षित तरुणींच्या जिल्हाधिकारी यांना ३६ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या या मोर्चात सहभागी होण्यासाठी बुधवारी, सकाळी ११ वाजेपासूनच जळगावातील शिवतीर्थ मैदानावर जिल्ह्यातून बहुजन समाजातील युवक-युवती, महिला- पुरुष यांनी जमायला सुरुवात केली होती. याठिकाणी निळे ध्वज, पांढऱ्या रंगाच्या वेशभूषेत अनेक बहुजन बांधव लक्ष वेधून घेत होते. प्रत्येकाच्या हातात मागण्यांचे फलक झळकत होते. नियोजित वाहनतळांवर वाहने लावून जिल्ह्यातून येणारे बांधव शिवतीर्थ मैदानापर्यंत शिस्तीत घोषणा देत मैदानावर येत होते.

दुपारी १ वाजता मोर्चाला शिवतीर्थ मैदानावरून सुरुवात झाली. रस्त्यांच्या एका बाजूने सर्वात पुढे बहुजन क्रांती मोर्चाच्या संयोजन समितीचे मुकुंद सपकाळे, नगरसेवक राजू सूर्यवंशी, जगन सोनवणे, शिवचरण ढंढोरे, शिवाजीराव पाटील, अशोक लाडवंजारी, प्रशांत नाईक, विवेक ठाकरे, रमजान तडवी, सुभाष सोनवणे, वसंत महाजन डॉ. मिलींद कोल्हे. करीम सालार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यापाठोपाठ तरुणी महिला, पुरुष अशा क्रमरचनेने मागण्यांच्या घोषणा देत मोर्चा शिवतीर्थ मैदानावरुन जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.

Check Also

‘नोटाबंदी’, विनाशकाले विपरीत बुद्धी

केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय अयोग्य आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *