facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १०० कोटी

औरंगाबादच्या रस्त्यांसाठी १०० कोटी

औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी राज्य सरकार अर्थसंकल्पात किमान १०० कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे महापालिकाचे प्रशासन रस्ते विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या कामाला लागले आहे.
औरंगाबादेतील रस्ते विकासासाठी राज्य शासनाने विशेष बाब म्हणून किमान १५० कोटी रुपयांचा निधी महापालिकेला द्यावा अशी मागणी सहा महिन्यांपासून केली जात आहे. तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही दिले होते, पण त्यांच्या कार्यकाळात शासनाकडून पालिकेला निधी मिळाला नाही. तुपे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचे भगवान घडमोडे महापौर झाले. त्यामुळे आता राज्य सरकार महापालिकेला रस्ते विकासासाठी नक्की निधी देईल, असे मानले जाते.
रस्त्यांच्या कामांना निधी मिळावा म्हणून घडमोडे यांनी आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘निधी देतो, पण शहरातील मुख्य रस्त्यांची कामे करा. गल्लीबोळातील कामे करू नका,’ असे त्यांनी घडमोडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांना सांगितले. पोलिस क्रीडा स्पर्धेनिमित्त दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शहरात आले होते. त्यावेळीही घडमोडे यांनी त्यांच्याकडे निधीचा विषय काढला, तेव्हा ‘निधी नक्की दिला जाईल,’ असा शब्द त्यांनी दिला.
मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार; राज्याच्या अर्थसंकल्पात औरंगाबाद शहरातील रस्त्यांसाठी तरतूद केली जाणार आहे. पहिल्या वर्षी किमान १०० कोटींची तरतूद असेल, असे मानले जात आहे. तरतूदीपूर्वी महापालिकेने रस्ते विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा, असे शासानतर्फे कळविण्यात आले आहे.

रस्त्यांच्या कामासाठी निधी देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भूमिका सकारात्मक आहे. मुख्य रस्त्यांची कामे करा, असे त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार मुख्य रस्ते व वर्दळीच्या रस्त्यांची यादी करून त्याचा ‘डीपीआर’ तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत शासनाला ‘डीपीआर’ सादर केला जाणार आहे.
– भगवान घडमोडे, महापौर.

Check Also

थकबाकीवर ‘बँड’चा उतारा

आवाज न्यूज नेटवर्क – . औरंगाबाद – मालमत्ता कर न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर बँड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *