facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / जळगाव / खान्देशात थंडीचा कडाका

खान्देशात थंडीचा कडाका

उत्तरेकडून येणाऱ्या शीत वाऱ्यांमुळे खान्देश पट्ट्यात धुळे, जळगाव शहरात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांत जळगावात किमान तापमानात घसरण होत आहे. ते तापमान ७ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तसेच धुळे जिल्ह्यातही तापमानाचा निच्चांकी पारा हा बुधवारी (दि. ११) ४.२ नोंदविला गेला. पारा पाचखाली गेल्याने नागरिकांना बोचरी थंडीचा अनुभव मिळत आहे. थंडीसह अंगाला झोंबणाऱ्या शीतवाऱ्यांनी नागरिकांमध्ये हुडहुडी निर्माण होत आहे. दुपारीदेखील उबदार कपड्यांसह अबालवृद्धांच्या कानाला टोप्या दिसत आहेत.

जळगावात थंडीची चाहूल

जळगाव : नोव्हेंबर मध्यापासून जळगावात थंडीची चाहूल लागली होती. त्यानंतर तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर आलेल्या ‘नाडा’ या वादळामुळे उत्तरेतील वारे रोखले गेले. त्यामुळे पुन्हा किमान तापमान वाढून १५ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. तसेच आंध्राच्या किनारपट्टीवर आलेल्या वादळामुळे काही दिवस थंडी रोखली गेली. मात्र डिसेंबर अखेरपासून किमान तापमान ९ ते १० अंश सेल्सिअसवर आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान ७.५ सेल्सिअसपर्यंत खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला आहे.

बोचऱ्या वाऱ्यांमुळे प्रचंड गारठा

कमाल तापामानातही घसरण आल्याने गारठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गारव्यासह झोंबणाऱ्या गार वाऱ्यांनीही जळगावकरांची हुडहुडी वाढवली आहे. दुपारीही अंगाला बोचऱ्या वाऱ्यांमुळे प्रचंड गारठा जाणवत होता. थंडीचा जोर वाढल्याने शिवतीर्थ मैदानावर आलेल्या स्वेटर विक्रेत्यांकडे खरेदीसाठी शहरात नागरिकांची रात्री उशिरापर्यंत झुंबड उडत आहे. थंडीमुळे सकाळी नागरिकांच्या अंगात दिसणारे उबदार कपडे दोन दिवसांपासून दुपारीही अंगावर दिसत आहेत. रात्री अनेक भागाच शेकोट्या करून ऊब मिळविताना नागरिक दिसत आहेत.

Check Also

‘नोटाबंदी’, विनाशकाले विपरीत बुद्धी

केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय अयोग्य आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *