facebook
Thursday , May 25 2017
Breaking News
Home / नाशिक / ‘वसाका’साठी धीर धरा, सहकार्य करा

‘वसाका’साठी धीर धरा, सहकार्य करा

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वेळकाढूपणामुळे वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचा यावर्षी गळीत हंगाम सुरू करण्यात कारखाना व्यवस्थापनास अडचण आली. मात्र, पुढील गळीत हंगाम वेळेवर व पूर्ण क्षमतेने चालू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ कटिबद्ध आहे. यासाठी कारखान्याशी संलग्न असलेल्या सर्व घटकांनी सहकार्य करावे, असे जाहीर आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्राप्त परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी सभासद व कामगारांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावरील श्रीराम मंदिरात शुक्रवारी (दि. १३) रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने चालू गळीत हंगाम सुरू करण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. परंतु, जिल्हा बँकेने कारखान्याला कर्ज देण्यासाठी दिरंगाई केली. तसेच मुंबई जिल्हा बँकेला ना हरकत पत्र देण्यासही टाळाटाळ केल्याने कारखान्याला गळीत हंगाम सुरू करता आला नाही. मात्र, पुढील हंगाम यशस्वीपणे व पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी प्राधिकृत मंडळ आत्तापासून कामाला लागले आहे. राज्य सहकारी बँक तसेच मुंबई जिल्हा बँकेकडे नव्याने प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व सभासद व कामगारांनी निश्चिंत राहावे, असे आवाहन आमदार आहेर यांनी केले.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने वसाकाला अल्पमुदतीचे दोन कोटी रुपये कर्ज मंजूर केले असून, त्याचे रुपांतर मध्यम मुदतीच्या कर्जात करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाची कारखान्याचे सभासद व कामगार यांचे शिष्टमंडळ लवकरच भेट घेणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली. प्रास्तविक कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले. केदा आहेर, धनंजय पवार, अभिमन पवार, जिल्हा परिषद सदस्य रवीद्र देवरे, नितीन पवार उपस्थित होते.

इतर प्रकल्प सुरू करा
कारखान्याच्या प्राधिकृत मंडळाने सर्वांना विश्वासात घेऊन कारखाना, वीजनिर्मिती प्रकल्प तसेच आसवानी प्रकल्प खासगी व्यक्तीला अथवा कंपनीला चालविण्यास देण्यास प्रयत्न करावेत, अशी मागणी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष संतोष मोरे, वसंत निकम, संतोष सूर्यवंशी, शिवाजी सोनवणे यांनी केली.

Check Also

आचारसंहिताभंग सानपांना भोवणार?

पंचवटी परिसरात ग्रीन जीमच्या उद््घाटनाच्या माध्यमातून आचारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *