facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / Featured / हा तर बापूंचा अपमान!

हा तर बापूंचा अपमान!

खादी व ग्रामोद्योगच्या वार्षिक कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांचे चित्र दरवर्षी पाहायला मिळत होते. पण, २०१७च्या कॅलेंडर आणि डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरख्यासोबत असणारे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. खादी आणि ग्रामोद्योग संकल्पनेला वाढविणाऱ्या बापूंचा हा अपमान आहे. जनतेने या प्रकाराला विरोध करावा, असा सूर गांधीवाद्यांनी व्यक्त केला आहे.

खादी आणि ग्रामोद्योग डायरी व कॅलेंडर व गांधीजींऐवजी मोदी यांचा फोटो टाकणे म्हणजे खादी कमिशनच्या अध्यक्षाने चापलुसी करण्याचा प्रकार आहे. यामुळे गांधीजींच्या प्रतिमेला धक्का बसेल असे वाटत नाही. गांधी यांचे चरखा आणि त्यांचे स्थान अमर-अटळ आहे, असे मत सेवाग्राम आश्रमाचे प्रमुख जयवंत मठकर यांनी व्यक्त केले. ‘काते सो पहनेे, पहने सो काते’ असे सांगितले जाते. स्वेच्छा, दारिद्र्य स्वीकारून गांधी विचारांचा मूलाधार ग्रहण करूनच चरखा चालविणे अभिप्रेत आहे. त्यात कोणतीही महत्त्वाकांक्षा असू नये, असे सेवाग्राम आश्रमाचे सचिव डॉ. श्रीराम जाधव म्हणाले. खादी ही महात्मा गांधी यांनी भारताला दिलेली देण आहे. यावर जाहिरातबाजी करून अतिक्रमण करण्याचा हा प्रकार निषेधार्ह आहे, असे मत गांधीवादी कार्यकर्ते कुसुमताई पांडे, रवींद्र पंढरीनाथ यांनी व्यक्त केले आहे.

‘खादी कमिशनला उत्तर मागा’

अविनाश काकडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात आले आहे. यात खादी कमिशनला उत्तर मागण्या‌विषयीची विचारणा करण्यात आली आहे.

हा दोष खादी कमिशनवाल्यांचा आहे. खरे तर मोदींमुळे खादी पुन्हा चर्चेत आली. परंतु त्यासोबतच नकली खादीचा सुळसुळाट झाला आहे. हे खादीच्या तत्त्वाविरुद्ध असून याचा निर्बंध करण्याऐवजी कमिशन उफराटे कामे करीत आहेत. हे बरे नव्हे.

– जयवंत मठकर, सेवाग्राम आश्रमाचे प्रमुख

Check Also

विकास कामे झाली, पण ठराविक लॉबीचीच झाली – यशवंत भोसले

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *