facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / जळगाव / हॉटेलच्या बांधकामावर हातोडा

हॉटेलच्या बांधकामावर हातोडा

रामानंदनगर परिसर शास्त्री नगरातील सनराईज हॉटेलच्या संचालकाने सामासिक जागेत भिंती व शेडचे अनधिकृत बांधकाम केले होते. याबाबत नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी केलेल्या तक्ररींवरुन महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने हे अनधिकृत बांधकाम उध्वस्त केले.

जळगाव मोठी लोकावस्ती असलेल्या शास्त्रीनगर भागात सनराईज हॉटेल बंद करण्यासाठी आणि अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी नगरसेविका बेंडाळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिले होते. विशेष म्हणजे या हॉटेलचे सामासिक जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होत. त्याबाबत बेंडाळे यांनी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरुन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारी हॉटेलचे अनधिकृत केलेले बांधकाम तोडले. काहीवेळ हॉटेल मालकाने पथकास विरोध केला होता. मात्र महापालिकेच्या अभियंत्यांनी त्यास हे बांधकाम अनधिकृत असल्याचे समजावून सांग‌ितले.
त्यानतंर पथकातील कर्मचारी यांनी हॉटेलच्या २ अनधिकृत भिंती व १० बाय ३० शेडचे बांधकाम पाडले. नगररचना विभागातील समिर बोरोले, अतिक्रमण अधिक्षक एच.एम.खान यांच्यासह पथकाने अतिक्रमाची कारवाई केली. महापालिकेच्या या निर्णयामुळे इतर व्यावसायिकांमध्ये धडकी भरली आहे. तर दुसरकीकडे सर्वसामान्य जळगावाकरांनी या निर्णयाचे कौतुक केले आहे.

Check Also

‘नोटाबंदी’, विनाशकाले विपरीत बुद्धी

केंद्र शासनाकडून घेण्यात आलेला नोटाबंदीचा निर्णय अयोग्य आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास सहन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *