facebook
Sunday , May 28 2017
Breaking News
Home / Featured / अॅमेझॉन धडा कधी घेणार? आता चपलेवर गांधीजी!

अॅमेझॉन धडा कधी घेणार? आता चपलेवर गांधीजी!

भारतीय ध्वजाची पायपुसणी केल्यावर मागितलेल्या माफीला दोन दिवस उलटत नाहीत तोच अॅमेझॉनने एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. अॅमेझॉनने आता ‘गांधी फ्लिप फ्लॉप्स’ नावाने महात्मा गांधीजींचे छायाचित्र असलेली स्लीपर अमेरिकन ई-कॉमर्स साईटवर उपलब्ध केली आहे.

या स्लीपर्सचे वर्णन अॅमेझॉनने ‘गांधी फ्लिप फ्लॉप्स’ या फोम रबर फ्लिप फ्लॉप्स, बीच सॅंडल्स असे केले आहे. यांची किंमत १६.९९ डॉलर्स म्हणजे सुमारे १२०० रुपये आहे. अॅमेझॉन युएस वेबसाइटवर या चपला दिसत आहेत. मागच्याच आठवड्यात अॅमेझॉनला झेंड्याच्या रंगांची पायपुसणी विकायला ठेवल्याने परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. त्यांनी अॅमेझॉनला तत्काळ बिनशर्त माफी मागायला लावली आणि ही सर्व वादग्रस्त उत्पादने मागे घ्यायला लावली. माफी मागितली नाही तर अॅमेझॉनच्या एकाही अधिकाऱ्याला भारतीय व्हिसा दिला जाणार नाही, असा इशाराही स्वराज यांनी टि्वटरवरून दिला होता. यावर अॅमेझॉनने तत्काळ ही पायपुसणी आपल्या उत्पादनांच्या यादीतून हटवली आणि भारतीयांच्या भावना दुखावल्याबद्दल लेखी माफी मागितली.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *