facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / मुंबई महापालिकेत उपमहापौरपद द्याः आठवले

मुंबई महापालिकेत उपमहापौरपद द्याः आठवले

‘मुंबई महापालिकेत महापौर महायुतीचाच होईल, परंतु अडीच वर्षांचे उपमहापौरपद व स्थायी समितीचे एक सभापत‌िपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला मिळाले पाहिजे,’ अशी मागणी रिपाइं अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शनिवारी केली.

औरंगाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाच्या निमित्याने आठवले शहरात आले होते, त्याचे औचित्य साधून पत्रकार संघाने त्यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. आठवले म्हणाले, ‘राज्यात जिल्हा परिषद व दहा महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यात मुंबई महापालिकेची निवडणूक सर्वात प्रतिष्ठेची आहे. २०१२मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीसमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आव्हान होते, पण त्यावेळी रिपाइं युतीसोबत असल्यामुळे पालिकेवर महायुतीची सत्ता आली. यावेळीही शिवसेना – भाजप – रिपाइं महायुतीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका आहे. शिवसेना-भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे. आम्ही एकत्र लढलो, तर मोठे यश मिळेल. आम्ही आमच्याच मतांमध्ये विभागणी केली, तर अपेक्षित यश मिळणार नाही. निवडणुकीत शिवसेना – भाजप वेगवेगळे लढले तरी त्यांना निवडणुकीनंतर एकत्र यावेच लागेल, कारण बहुमत कुणाचेच येणार नाही. मुंबई महापालिकेत महापौर महायुतीचाच होईल. अर्थात ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा महापौर होईल, परंतु अडीच वर्षांचे उपमहापौरपद व स्थायी समितीचे एक सभापत‌िपद त्यांनी रिपाइंला द्यावे. शिवसेना – भाजप एकत्र आलेच नाही, तर रिपाइंचा पाठिंबा भाजपला असेल,’ असे आठवले यांनी स्पष्ट केले. वार्तालापाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संघाचे मार्गदर्शक प्रमोद माने यांनी केले. अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी यांनी रामदास आठवले यांचे स्वागत केले.

दलित आरक्षणाला धक्का लावू नका

‘जिल्हा परिषद निवडणुकीतही ज्या ठिकाणी शिवसेना – भाजपची युती होणार नाही, त्या ठिकाणी रिपाइंचा पाठिंबा भाजपला असेल. जिल्हा परिषद निवडणूक रिपाइं भाजपच्या सोबत लढेल, पण भाजपने आम्हाला ‘कमळाची’ सक्ती करू नये, कारण आमची वेगळी ओळख आहे. दुसऱ्यांना निवडून आणण्याची आमच्यात ताकद आहे. मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. हे आरक्षण देताना दलित समाजासाठीचे आरक्षण कमी करू नका. या समाजांना आरक्षण देण्यासाठी घटनेत दुरूस्ती करावी लागेल, त्यासंदर्भात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलणार आहोत,’ असेही आठवले नको.

Check Also

थकबाकीवर ‘बँड’चा उतारा

आवाज न्यूज नेटवर्क – . औरंगाबाद – मालमत्ता कर न भरणाऱ्या बड्या थकबाकीदारांच्या घरासमोर बँड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *