facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / नागपूर

नागपूर

मराठा मोर्चांविरुद्ध संघाचे कारस्थान

‘दलितांना चिथावून त्यांना मराठा मोर्चाविरुद्ध मोर्चेबांधणी करण्याकरिता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ षडयंत्र रचत आहे. काही दलित नेते आणि कार्यकर्त्यांना भेटून संघ परिवारातील काही पदाधिकाऱ्यांनी तसा प्रस्तावसुद्धा दिला होता. त्यासाठी संघातर्फे दलित आणि बहुजनांच्या मोर्चांना आर्थिक रसद पुरविण्याचे आमिषसुद्धा दिले गेले होते’, असा खळबळजनक आरोप बामसेफचे प्रमुख वामन मेश्राम यांनी केला. नागपुरात …

Read More »

हा तर बापूंचा अपमान!

खादी व ग्रामोद्योगच्या वार्षिक कॅलेंडर आणि डायरीवर महात्मा गांधी यांचे चित्र दरवर्षी पाहायला मिळत होते. पण, २०१७च्या कॅलेंडर आणि डायरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरख्यासोबत असणारे छायाचित्र प्रकाशित करण्यात आले आहे. खादी आणि ग्रामोद्योग संकल्पनेला वाढविणाऱ्या बापूंचा हा अपमान आहे. जनतेने या प्रकाराला विरोध करावा, असा सूर गांधीवाद्यांनी व्यक्त केला …

Read More »

हे देवा, १०० रुपयांची लाच!

वाहनाचा विमा नसल्याने परवाना परत देण्यासाठी अजनी पोलिस स्टेशनच्या हेडकॉन्स्टेबलने वाहनचालकाकडून १०० रुपयांची लाच घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस विभागात प्रचंड खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता ‘हे देवा , पोलिसांना सुधरवा’, अशी म्हणण्याची वेळ नागपूरकरांवर आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस आयुक्त डॉ. के.व्यंकटेशम् यांनी हेडकॉन्स्टेबलला निलंबित करून चौकशीचे आदेश …

Read More »

अबब! कोल्ड्रींकवर ६६ टक्के अधिक शुल्क

रेफ्रीजरेटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या बहुतांश डबाबंद पदार्थांवर अतिरिक्त शुल्क घेण्याचा अनधिकृत पायंडा अनेकांनी घातला आहे. पण, कोल्ड्रींकच्या बाटलीवर मूळ किमतीपेक्षा तब्बल ६६ टक्के अधिक शुल्क आकारण्याचा प्रकार छोट्या नाही तर हल्दिरामसारख्या मोठ्या हॉटेलात घडला आहे. ग्राहक या नात्याने प्रत्येकाची छोट्या-मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे आजवर वारंवार दिसून आले आहे. काहीवेळेस ग्राहक …

Read More »

दोन झोनमध्ये अतिक्रमण कारवाई

आवाज न्यूज नेटवर्क –  नागपूर – महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांनी विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत इमारतींच्या अवैध बांधकामांवर बुलडोजर चालविला. एका बांधकाम मालकास वेळ देऊन त्यांच्याकडून २० हजार पथक शुल्क दंडाच्या स्वरुपात वसूल करण्यात आली. अन्य पथकाने केडीके कॉलेज चौक ते सक्करदरा चौकादरम्यान जाहीरात फलके व बॅनर्स हटविले. मंगळवारी झोनमधील छावनी परिसरातील …

Read More »

गुन्हेगाराला पक्ष नसतो, सोडणार नाही!

‘गुन्हेगार हा गुन्हेगार असतो. तो कोणत्याही राजकीय पक्षाचा असो, गय केली जाणार नाही,’ असा इशारा नागपूर ग्रामीणचे नवनियुक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला. पोलिस अधीक्षक अनंत रोकडे यांच्याकडून बलकवडे यांनी मंगळवारी सायंकाळी कारभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी आपला ‘अॅक्शन प्लॅन’ सादर केला. जिल्ह्यातील गुन्हेगारांची यादी तयार करण्याचे निर्देश देण्यात आले …

Read More »

आणखी ‘मोबाइल डेंटल व्हॅन’

दुर्गम भागातील दंतरुग्णांना सेवा मिळावी, यासाठी शासकीय दंत वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आणखी एक ‘मोबाइल डेंटल व्हॅन’ मिळणार आहे. कॉँग्रेसचे तत्कालीन खासदार अविनाश पांडे यांनी यासाठी २६ लाख रुपये मंजूर केले. त्यानंतर दंत प्रशासनाने टेंडर काढले. टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून, तांत्रिक प्रक्रिया लवकरच पार पडून फेबु्रवारी २०१७ अखेरीस शासकीय …

Read More »

पालिकेच्या दंगलीत दिग्गजांना धक्के

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या विदर्भातील ७ नगर परिषदांवर भाजपने झेंडा फडकवला मात्र चार ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठीत, आमदार आशीष देशमुख यांच्या काटोलमध्ये भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले. गोंदियात माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची सद्दी …

Read More »

काँग्रेसमधील ‘नाराजीनाट्य’ संपले?

काँग्रेसमध्ये मुलाखतीसाठी नाराजीनाट्य संपल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हे केवळ गटाच्या उमेदवाराचा पत्ता कापू नये यासाठी की पक्षाच्या भल्यासाठी, याबाबत पक्षांतर्गत चर्चेला पेव फुटले असे असले तरी रविवारी देवडियात काँग्रेसमध्ये मनपा निवडणुकीसाठी इच्छुकांसाठीच्या मुलाखतीचे हे वास्तव होते. भाजपच्या तुलनेत काँग्रेसने एकाच दिवसात तब्बल १३ प्रभागांच्या मुलाखती आटोपत वेगाने कार्यक्रम पूर्ण …

Read More »

बेहिशेबी रोख करा ३१ मार्चपर्यंत जाहीर

ज्या नागरिकांनी त्यांच्याकडील रोख व ठेवीच्या रूपातील करपात्र उत्पन्न जाहीर केलेले नाही आणि अशा उत्पन्नावर कर अदा केलेला नाही, त्यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून आपल्या उत्पन्नावर कर भरावा. पुढील कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही, अशी दक्षता घ्यावी, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. आयकर विभागाच्यावतीने आयोजित एका चर्चासत्रात …

Read More »