facebook
Sunday , April 30 2017
Breaking News
Home / मुंबई

मुंबई

मुंबईचा उत्साह धावतोय!…मुंबई मॅरेथॉनला सुरुवात

मुंबईकरांचा आजचा रविवार बोचरी थंडी असूनही उत्साहात सुरू झाला आहे. निमित्त आहे १४ व्या स्टॅंडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनचे. राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी पहाटे या मॅरेथॉनचे उद्धाटन केले. ४२ किलोमीटर्सच्या मुख्य मॅरेथॉनला पहाटे सीएसटीहून सुरूवात झाली. यात धावपटू सीएसटीहून वांद्रेपर्यंतचे अंतर कापतील. वांद्रे येथून पुन्हा सीएसटीला या मॅरेथॉनचा शेवट होईल. …

Read More »

भाजपच्या अटीवर शिवसेनेचा टोला

‘कारभारात पारदर्शकता हवी असे आता राज्यकर्त्यांतर्फे ऊठसूट सांगितले जाते, पण पारदर्शक कारभार कसा याचे प्रात्यक्षिक त्या वेड्या ठरवण्यात आलेल्या जवानाने दाखवले’, असा सणसणीत टोला आज शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. जवान वेडे, आत्महत्या करणारे शेतकरी ठार वेडे, ‘नोटाबंदी’सारख्या विषयावर परखड सत्य मांडणारे देशद्रोही; मग या देशात शहाणे कोण? याचाही …

Read More »

युतीच्या जागावाटपात ९० ते ९५ जागांवर समाधान मानण्याची शक्यता

मागील वर्षभरापासून मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या भाजपने युती करण्याची तयारी दर्शवून स्वबळाचे एक पाऊल मागे घेतले आहे. याच धर्तीवर युतीच्या जागावाटपात भाजप ९० ते ९५ जागा घेऊन समाधान मानणार असल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. अडीच वर्षांपूर्वी केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर भाजपने मुंबई महापालिकेत शत प्रतीशत भाजपचा …

Read More »

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याआधीच केला जातो. तर देशात १५ ते १९ वयोगटातील महिलांच्या पो‌टी दरवर्षी सरासरी १७ लाख बालकांचा जन्म होतो. विवाहानंतर अपत्यप्राप्तीसाठी त्यांच्यावर लगेच दबाव आणला जातो. तसेच कुटुंब नियोजनाकडे लक्ष नसल्याने देशात …

Read More »

संभाजी ब्रिगेडचा इशारा; ‘शिवसेना भवना’ला पहारा

मुंबईतील शिवसेना भवनावर असलेलं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं छायाचित्र काढून टाका, असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिल्यानंतर शिवसैनिकांनी शिवसेना भवनाला पहारा देण्यास सुरुवात केली आहे. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी काही आगळीक करू नये म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. ‘शिवसेना भवना’च्या दिमाखदार वास्तूवर दर्शनी भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. या …

Read More »

ओम पुरी मृत्यू: पाच जणांचे जबाब नोंदवले

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत पुढे आले असले तरी पोलिस त्यांच्या मृत्यूची चौकशी करत आहेत. या मृत्यूप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी पुरी यांच्या जवळच्या पाचजणांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. ओम पुरी यांचा शवविच्छेदन अहवाल जे. जे. रुग्णालय आणि कलिना न्यायवैद्यक शाळेतून अद्याप आलेला नाही. …

Read More »

मुंबई गारठली, ३ वर्षांतले निचांकी तापमान

मुंबई गेल्या दोनेक दिवसांपासून गारठू लागली आहे. मंगळवारी मोसमातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. बुधवारी पारा आणखी अंशाने गोठला आणि आज पहाटे गेल्या ३ वर्षांतल्या जानेवारीतल्या सर्वात कमी तापमानाची नोंद तापमापकावर झाली. आज सांताक्रूझ वेधशाळेने १२.५ अंश सेल्सिअस इतके किमान तपमान नोंदवले. हे २०१३ सालानंतरचे जानेवारीतले निचांकी तापमान आहे. …

Read More »

रेल्वे रुळाला तडे, हर्बर २५ मिनिटे लेट

मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे गेल्यानं हार्बर मार्गाची वाहतूक २० ते २५ मिनिटे उशीरानं धावत आहे. त्यामुळं सकाळी सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना मनस्तापाला सामोरे जावं लागलं. पहाटे ६ वाजून २५ मिनिटांनी मानखुर्द रेल्वे स्थानकाला तडे गेले. त्यामुळं पनवेलवरून सीएसटीला जाणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. रुळाला तडे गेल्याने हार्बर सेवा …

Read More »

नोटाबंदीनंतर शहीद झालेल्यांचा आकडा जाहीर करा!: शिवसेना

मोदी सरकारच्या नोटाबंदीला सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या शिवसेनेनं आपल्या हल्ल्याची धार अधिकच तीव्र केली आहे. नोटाबंदीनंतर काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद ६० टक्क्यांनी घटल्याच्या दाव्याचा जोरदार समाचार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून घेतला आहे. ‘नोटाबंदीनंतर शहीद झालेल्या सैनिकांचा खरा आकडा जाहीर करा,’ असं आव्हानच ठाकरे यांनी मोदी सरकारला दिलं आहे. नोटाबंदीच्या …

Read More »

विक्रम हुकला आणि झालाही!

काळाचौकी येथील चाळीत राहणाऱ्या मुकुंद गावडे या तरुणाने नेटमध्ये सलग शंभर तास फलंदाजी करून जागतिक विक्रम नोंदवण्यासाठी प्रयत्न केला खरा, परंतु वैद्यकीय अडचणीमुळे त्याला शंभर तासांचा पल्ला गाठता आला नाही. मात्र, त्याची ही ७२ तासांची फलंदाजीही एक विक्रम ठरला असून, त्याच्या नोंदीसाठी मुकुंदने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’कडे दावा केला …

Read More »